Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास ’- +’ दर्जा प्राप्त

गुणवत्ता विकासात महाविद्यालयाची उत्तुंग भरारी

अंबाजोगाई प्रतिनिधी - नॅकच्या चौथ्या पुनर्मुल्यांकन व मानांकनामध्ये घवघवीत यश संपादन करत ’- + दर्जा’ प्राप्त केला. अंबाजोगाई या शैक्षणिक, सांस्

विवेकवादाची पेरणी
आघाडीतील प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडत आहे… फडणवीसांचा घणाघात…
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे निधन

अंबाजोगाई प्रतिनिधी – नॅकच्या चौथ्या पुनर्मुल्यांकन व मानांकनामध्ये घवघवीत यश संपादन करत ’- + दर्जा’ प्राप्त केला. अंबाजोगाई या शैक्षणिक, सांस्कृतिक वातावरण लाभलेल्या शहरामध्ये यशंतराव चव्हाण महाविद्यालय हे नावलौकिक प्राप्त महाविद्यालय आहे. आजवर महाविद्यालयाने नॅकच्या धोरणानुसार तीनवेळा  मूल्यांकन करून घेतले. यावेळी महाविद्यालयाचे चौथे मूल्यांकन दि. 17 व 18 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाले. चौथ्या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाने 3.45 इतके गुण घेत ’- + दर्जा’ श्रेणीतील सर्वोत्कृष्ट दर्जा प्राप्त केला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस मा. आ. सतीश भाऊ चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा. दत्तात्रय पाटील, मा. रमेशराव आडसकर, मा. डॉ. नरेंद्र काळे, मा. वसंतराव मोरे, डॉ. अण्णासाहेब जाधव, प्रा. एस के जोगदंड, मा. अमर देशमुख, मा. श्रीमती प्रतिभाताई देशमुख, मा. रणजीत लोमटे, मा. सय्यद पाशू करीम, अंतर्गत गुणवत्ता हमीभागाचे निमंत्रित सदस्य श्री. अनिकेत लोहिया व श्री. रणजीत मोरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अँड. जयसिंग चव्हाण यांनी सर्वांचे कौतुकासह अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या या यशामध्ये प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, उपप्राचार्य प्रा. पी.के. जाधव, गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद राजपंखे, डॉ इंद्रजित भगत,कार्यालय अधीक्षक बी. एम. कांबळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ, पालक संघ, महाविद्यालयाचे नियमित विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS