Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात व्याज उकळणार्‍या सावकाराला अटक

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील एका 48 वर्षीय व्यक्तीने मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी एका खाजगी सावकाराकडून साडेसात लाख रुपये उधारीवर घेतले होते. त्या

दक्षिण कोरियाचा पराभव करून भारत उपांत्य फेरीत पोहोचला
तालिबान्यांनी घेतले अफगाणिस्तान ताब्यात ; राष्ट्रपती अशरफ घनी परागंदा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील एका 48 वर्षीय व्यक्तीने मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी एका खाजगी सावकाराकडून साडेसात लाख रुपये उधारीवर घेतले होते. त्याबदल्यात 20 लाख 74 हजार रुपयांची परतफेड त्यांनी केलेली होती. मात्र, त्यानंतरही आणखी साडेआठ लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणार्‍या खाजगी सावकाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
नीरज कुमार रामचंद्र मंडळ (वय -45, रा.पिंपळे गुरव, पुणे) त्याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचा प्रकार मे 2017 ते एप्रिल 2023 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी आरोपी नीरज कुमार मंडल यांच्याकडून पाच आणि चार टक्के व्याजदराने एकूण सात लाख 50 हजार रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात तक्रारदार यांनी आरोपी जून 2017 ते मे 2022 पर्यंत साडेसात लाख रुपयांच्या मोबदल्यात 13 लाख रुपये रोख व सात लाख 74 हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात असे एकूण 20 लाख 74 हजार रुपये दिलेले होते.

COMMENTS