Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातुरात 78 बँक कर्मचार्‍यांनी केले रक्तदान

लातूर प्रतिनिधी - ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज अससोसिएशन या बँक कर्मचारी देशव्यापी संघटनेच्या 78 वा वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र स्ट

इंदापूरात गोळी झाडून एकाची हत्या
भाऊजीने केला मेहुण्याचा खून
किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

लातूर प्रतिनिधी – ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज अससोसिएशन या बँक कर्मचारी देशव्यापी संघटनेच्या 78 वा वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली बँक कर्मचारी समन्वय समिती, लातूरच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 78 कर्मचा-यांनी रक्तदान केले.
जगात विज्ञानाने प्रगती केली असली तरी अजून कृत्रीम रक्त तयार करणे शक्य झाले नसल्याने रक्तदानाचे अनन्य साधारण महत्व आहे. सहज करता येणारी ती समाजसेवा असल्याने सर्वांनी रक्तदान करावे, असे आवाहन बँक कर्मचारी समन्वय समितीचे नेते कॉ. राहुल सावंत यांनी केले. समाजाप्रती बांधीलकी हे आपल्या संघटनेचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण दरवर्षी हा उपक्रम राबवित असतो. तो तरुण पीढीने हिरीरीने राबवून किमान 78 जणांनी रक्तदान करुन संघटनेचा वर्धापन दिन साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. व्यासपीठावर भालचंद्र ब्लड बँकेचे अधिकारी डॉ. योगेश गावसाने हजर होते. बँक कर्मचारी समन्वय समितीने ब्लड बँकेच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर आयोजित केले होते.याची आठवण देवून या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. थालसेमीया सारख्या रोगात दरमहा रक्त द्यावे लागते त्यामुळे बँक कर्मचा-यांनी वेळोवळी अशी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत तसेच रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार करण्याची सूचना ही त्यांनी केली. या प्रसंगी अधिकारी संघटनेचे कॉ. सोहन खरात यांनी ही मनोगत व्यक्त केले. हे शिबिर संघटीत करण्यासाठी कॉ. महेश गांधले, कॉ. पेंडसे, कॉ. स्वप्नील जाधव, कॉ. महेश घोडके, कॉ. सुधीर मोरे, कॉ. मांडे, कॉ. रेश्मा भवरे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन व आभार कॉ. परमेश्वर बडगिरे यांनी केले.

COMMENTS