Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यंबकेश्‍वरला पंगतीतील भेदाला मूठमाती

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील ग्रामदेवता महादेवीच्या गाव जेवणाच्या पंगतीत विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी वेगळी पद्

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
सेवाभावामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलचा नावलौकिक
निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज -संजय सपकाळ

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील ग्रामदेवता महादेवीच्या गाव जेवणाच्या पंगतीत विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी वेगळी पद्धत बसण्याची परंपरा बंद झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या तक्रारीनंतर दखल घेत ही प्रथा बंद करण्यात आल्याचे अंनिसने म्हटले आहे. त्र्यंबकेश्‍वरमधील महादेवी ट्रस्ट कडून होणार्‍या गावजेवणाच्या पंगतीत गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच खरेदी केलेल्या अन्नातून वेगळे शिजवले जाते तर इतर बहुजन समाजबांधवासाठी वेगळी पंगत ठेवली जाते, अशी तक्रार होती.

COMMENTS