Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीमा कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा

संजय राऊतांची आ. कुल यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संज

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे आदिवासी विभागाचा अतिरिक्त कारभार
नवे शिक्षण धोरण
शेल्टी येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाँचद्वारे सुरक्षित प्रवास

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला असून, यासंदर्भात कारवाई करण्यासाठी त्यांनी थेट सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आज ट्विटवरून ही माहिती दिली. तसेच, पत्रकार परिषदेतही याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
राऊत म्हणाले की, भाजप आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत. त्यांनीच भीमा पाटस कारखान्यात घोटाळा करून 500 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केले आहे. या भ्रष्टाचाराचे प्रकरण मी दोन महिन्यांपूर्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवले आहे. मात्र, दोन महिन्यांपासून ते मला भेटीसाठी वेळ देत नाहीये. त्यामुळे राहुल कुल यांच्या कारखान्याची मी आता सीबीआयकडे तक्रार केली आहे. सीबीआयने मला पोचपावतीही दिली आहे. राऊत म्हणाले, भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे लॉन्ड्रिंग झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे आता सीबीआयकडे दिले असून सीबीआय या प्रकरणात काय कारवाई करते, हे पाहू. विरोधी पक्षातील लोकांना अगदी 2 ते 5 लाख रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. मात्र, राहुल कुल यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे. यासंदर्भातील तक्रारीची प्रत त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली आहे.
सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत संजय राऊतांनी अनेक आरोप केले आहेत. कारखान्याच्या खात्यात असलेले 500 कोटी रुपये कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचा राऊतांचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही संजय राऊतांनी सीबीआयकडे केली आहे. दौंडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखान्याचे 1800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून मी राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याचं प्रकरण सीबीआयकडे पाठवले आहे. मी वारंवार गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे या कारखान्याबाबत पत्रव्यवहार केला होता. पण त्यांनी याबाबत दुर्लक्ष केल्याचे राऊत म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयला मी पूर्ण सूट दिली असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते, म्हणून हे प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहेत. सध्या राज्याचे गृहमंत्री याकडे लक्ष देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून चोरांना संरक्षण – संजय राऊत म्हणाले, पुरावे देऊनही देवेंद्र फडणवीसांनी राहुल कुल यांच्याविरोधात काहीही कारवाई केली नाही. त्यावरून गृहमंत्री फडणवीस हे केवळ विरोधकांवरच कारवाई करतात. मात्र, स्वपक्षातील भ्रष्टाचार करणार्‍यांना, चोर, लुटारूंचे फडणवीस संरक्षण करतात. फडणवीसांना आवाहन आहे की, त्यांनी दरोडेखोरांना पोटाशी घालू नये. महाराष्ट्रात हे फार काळ चालणार नाही, असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.

COMMENTS