Homeताज्या बातम्यासंपादकीय

‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल

राज्यात आगामी काही दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून, वर्षभरानंतर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका येवू घातल

माणूसकी ओशाळली
पंतजलीचा दावा आणि भूल
टोलवरून खडाजंगी

राज्यात आगामी काही दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून, वर्षभरानंतर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका येवू घातल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची आपल्या पक्षाच्या जागा कशा जास्तीत जास्त मिळतील, यासाठी रणनीती आखणे सुरू असतांनाच, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीला ज्यांच्यामुळे मूर्त स्वरूप मिळाले ते शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आधाडीची वज्रमूठ सैल होतांना दिसू येत आहे.
त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सुटीवर गेल्याच्या चर्चांनी जोर धरल्यामुळे महाराष्ट्रात पडद्याआडून जोरदार हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार म्हणाले की, आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे, तर महाविकास आघाडी आज आहे, उद्या सांगू शकत नाही, या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँगे्रस भाजपला पाठिंबा देण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शरद पवार भाजपला पाठिंबा देण्यास तयार होतील, अशी शक्यता नाही. मात्र पवार चाणाक्ष आहे, त्याचप्रमाणे ते आपला पक्ष फुटू देणार नाही. शिवसेना जशी फुटली आणि 40 आमदार बाहेर पडले त्याचप्रमाणे जर अजित पवार 35-40 आमदार घेवून बाहेर पडले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची जी अवस्था झाली तीच अवस्था शरद पवारांची होवू शकते, याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस आगामी काही दिवसांमध्ये भाजपला पाठिंबा देवू शकते, आणि आमच्या पक्षांतील आमदारांनी हा निर्णय घेतल्यामुळे मला देखील हा पाठिंबा द्यावा लागला असा पवित्रा शरद पवारांनी घेतला तर, नवल वाटायला नको. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल 15 मेपर्यंत येण्याची शक्यता आहे. अशावेळी शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेला तरी, भाजप सत्ता राखणार आहे. त्यामुळे राज्यात भाजपच्या सत्तेला धोका नाही. मात्र भाजपला नेमका धोका काय वाटतो, याचा कुणी विचार करत नाही. राज्यात जर आत्ता निवडणुका झाल्या तर, भाजपला पोषक वातावरण नाही. किंबहुना भाजप स्वतः एकहाती सत्ता मिळवू शकत नाही, किंबहूना तो विधानसभेच्या 115 जागा देखील राखू शकेल की नाही, याबाबतीत पक्ष नेतृत्वाला आणि राज्यातील नेत्यांना शंका आहे. अशावेळी आगामी निवडणुकीला सामौरे जाण्यासाठी एका ताकदवान पक्षाची भाजपला राज्यात सध्यात गरज आहे. अशावेळी भाजपला साथ देईल तो म्हणजे राष्ट्रवादी काँगे्रस. याआधी देखील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी पार पडलेलाच आहे. मात्र काही तासांमध्ये पहाटेचा शपथविधी कोलमडला. मात्र त्यावेळी देखील शरद पवारांचीच इच्छा भाजपसोबत जाण्याची होती. मात्र पवारांना काही वेळ हवा होता. आणि अजित पवारांच्या लक्षात मोठ्या साहेबांची खेळी न आल्यामुळे त्यांनी रात्रीच सुत्रे हलवली आणि पहाटेचा शपथविधी घडला. मात्र यावेळेस अजित पवार यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे. शिवाय त्यांनी मुख्यमंत्रीपदावर देखील दावा सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस भाजपसोबत जाण्यासोबत मुख्यमंत्रिपदावर देखील दावा सांगू शकतात. त्यासोबतच अजित पवारांवर राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी जी कारवाई होणार आहे, ती टळण्याची शक्यता आहे.
मात्र राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता, महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होतांना दिसून येत आहे. जी मूठ पवारांनी बांधली, तेच ही मूठ सैल करतांना दिसून येत आहे. त्यामुळे जागा वाटपावरून, अन्यथा कोणत्यातरी कारणावरून राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे. त्याचबरोबर जर राज्यात मुख्यमंत्री शिंदे पायउतार झाले तर, शिंदे गटातील अनेक आमदार पुन्हा एकदा घरवापसी म्हणजे ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहेे. शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिंदे गटातील अस्वस्थता बाहेर पडण्याची शक्यता आहे. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल, पक्ष टिकवण्याचे. त्यामुळे या सर्व बाबी कशा घडतात, कोण कशाला कशाप्रकारे सामौरे जाते, ते आगामी काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

COMMENTS