Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ईद’च्या खरेदीसाठी बाजारपेठ लगबग

लातूर प्रतिनिधी - पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहा साजरी केली जाते. यासाठी तयार करण्यात येणा-या विशेष मेनु ‘शिरखुर्म

10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार
कार्तिकी यात्रे निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी रेल्वेच्या ३५ फेऱ्या
लातूरमधील आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

लातूर प्रतिनिधी – पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहा साजरी केली जाते. यासाठी तयार करण्यात येणा-या विशेष मेनु ‘शिरखुर्मासाठी’ लागणारा सुका मेवा खरेदीसाठी गुरुवारी बाजारपेठेत लगबग वाढली होती. गतवर्षीच्या तुलनेत काही वस्तूंच्या दरात किंचित घसरण झाली आहे. ईद उद्या शनिवार दि. 22 एप्रिल रोजी साजरी होण्याची शक्यता (चंद्रदर्शनावरुन निर्णय) वर्तविण्यात येत असल्यामुळे विविध साहित्यांची जोरदार खरेदी केली जात आहे.
यंदा दि. 26 मार्चपासून रमजान महिन्यास प्रारंभ झाला. मार्चहिट आणि एप्रिलमधील उन्हाचा तडाखा अस होत असताना मुस्लिम समाज बांधव, भगिणी, मुलं, मुलींनी रोज करुन अल्हाकडे जगाच्या कल्याण दुआ मागितला आहे. आपला देश एका नाजुक वैचारिक परिस्थितीतून जात आहे. त्यातून बाहेर पडून एकासंघ भारताच्या निर्मितीसाठी शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ‘ईद-उल-फित्र’चा खास मेनु म्हणजे ‘शिरखुर्मा’. या दिवशी घराघरात ‘शिरखुर्मा’ तयार केला जातो. यासाठी काजु, बादाम, पिस्ता, अक्रोड, मनुका, खोबर, चारोळी, टरबुज बी, खरबुज बी, तूप, खवा, शेवई, खजुर, दुध आदी साहित्य लागते. कोरोनाने जवळपास सर्वांचीच परिक्षा घेतली. कोरोनाच्या काळात अनेकांचे आप्तस्वकिय आपल्यातून निघून गेले. अशा परिस्थितीत जात, धर्म, पंत, गरीब, श्रीमंत ही सर्व आयुधे गळून पडली होती. जीवंत होती ती फक्त माणुसकी. या माणुसकीची पुन्हा एकदा आठवण करुन देणारी ईद-उल-फित्र शनिवारी साजरी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वर्षी ईदच्या खेरदीसाठी गेल्या आठ दिवसांपासून लातूरची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईसह इतर भागात गर्दी वाढली आहे. दिवसभर उन्हाची तीव्रता अधिक असल्याने रात्री 8 वाजल्यानंतरच बाजारपेठ बहरत आहे. महिनाभराचे उपवास झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ‘ईद-उल-फित्र’ची सामुहिक नमाज ईदगाह व विविध मस्जिदींमधून पढली जाते. महिला भगिणी आपापल्या घरोघरी नमाज अदा करतात. नातेवाई, मित्र, परिवार, आप्तस्नेही एकत्र येऊन ‘शिरखुर्मा’ व इतर पदार्थांचा आस्वाद घेतात.

COMMENTS