Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री आर्चीने घेतलं ज्योतिबाचं दर्शन

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्

आमचा बोलवता धनी मराठा समाज मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
तरुण पिढीमध्ये विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक : न्यायाधीश नेत्रा कंक यांचे प्रतिपादन
अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. झुंड, आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटांतूनही रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. नुकतीच दख्खनचा राजा ज्योतिबाला गेली होती. इथला देवदर्शनाचा व्हिडिओ रिंकुनं शेयर केला आहे. नुकतचं रिंकून कोल्हापूर येथे जाऊन ज्योतिबाचं दर्शन घेतलं. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेत रिंकूनं देवाकडं साकडं घातलं. तिनं हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये रिंकूची आई, आजी देखील दिसत आहे. कुटुंबासोबत रिंकूने काही कुळाचार, विधी देखील पार पाडले. यावेळी मंदिरात रिंकूचे जोरदार स्वागत झाले. मंदिर प्रशासनाने तिचा आदर सत्कार केला.

COMMENTS