Homeताज्या बातम्यामनोरंजन

घरट्यातील अंडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना मोराने शिकवला धडा

आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याची वेळ येते तेव्हा माणूस आणि प्राण्यांमधील भावना सारखीच असते. आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी माणसांप्रमाणे प्राणी

‘वंचित‘चा स्वबळाचा नारा !
जन्मदात्या आईने आपल्या 39 दिवसाच्या बाळाला चौदाव्या मजल्यावरून फेकले
संगमनेर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निखील पापडेजा

आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याची वेळ येते तेव्हा माणूस आणि प्राण्यांमधील भावना सारखीच असते. आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी माणसांप्रमाणे प्राणीही लढा देतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मोर आपल्या अंड्याचं रक्षण करण्यासाठी एका महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीही मोराशी पंगा घेणार नाही. आणि जर घेतलाच तर व्हिडीओतील दोन महिलांप्रमाणे तुम्हालाही तुमच्या निर्णयावर पश्चाताप होण्याची वेळ येऊ शकते. व्हायरल व्हिडीओत दोन महिला झाडावरुन मोराची अंडी चोरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यामध्ये एक महिला झाडावर चढलेली असताना दुसरी महिला खाली उभे राहून अंडी झेलत होती. मात्र काही वेळातच मोर उडत येतो आणि झाडावर चढून घरट्यातून अंडी चोरणाऱ्या महिलेवर हल्ला करतो. यानंतर मोर खाली उभ्या महिलेवरही हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ट्विटरला 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

COMMENTS