Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतरस्ते अतिक्रमणमुक्तीसाठी प्रशासनाकडून मोहीम

निलंगा प्रतिनिधी - कृषी क्षेत्रात शेत रस्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शेत रस्त्यावरील अतिक्रमणे हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा असतो. शेत

जळगावातील अपघातात तिघांचा मृत्यू
जागृती शुगरच्या संचालकपदी बालाजी बिराजदार यांची निवड
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट

निलंगा प्रतिनिधी – कृषी क्षेत्रात शेत रस्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शेत रस्त्यावरील अतिक्रमणे हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा असतो. शेत रस्ता नसेल तर शेतक-याना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हिच बाब लक्षात घेऊन निलंगा तहसिलदार अनुप पाटील यांनी तालुक्यात शेत रस्ते अतिक्रमण मुक्तीची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत निलंगा तालुक्यातील चांदोरी-चांदोरीवाडी-वाकसा या शेतरस्त्यावरील आतिक्रमण काढण्यासाठी मंडळाधीकारी मिरजगावकर, वाकसा सरपंच विनायक पाटील, चांदोरी उपसरपंच भरत व्यंजने, तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यकांत सोळुंके, वाकसा पोलीस पाटील तसेच चांदोरी चांदोरीवाडी वाकसा , येथील शेतकरी उपस्थीत होते. ग्रामीण भागामध्ये शेत रस्त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आजही कायम आहे. अनेक गावामध्ये नकाशावर शेत रस्ते आहेत, परंतु, प्रत्यक्षात अतिक्रमणांमुळे या शेत रस्त्यांची पाऊलवाट झाली आहे. यामुळे शेताकडे ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. अनेक शेतक-याच्या पेरण्यांना विलंब होतो. शेतातील माल घराकडे घेऊन जाणेही जिकिरीचे होऊन बसते. अनेक शेतक-यांना शेतात नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा असतानाही रस्त्याची सुविधा नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत. शेतरस्ता मिळावा, यासाठी अनेक शेतक-याचे अर्ज प्रशासनाकडे पडून आहेत. काही प्रकरणे न्यायालयातही प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी शेत रस्त्याच्या कारणावरुन वादही होतात. एकूणच शेतीचा विकास करायचा असेल तर शेतरस्ता महत्त्वाचा आहे. हिच बाब लक्षात घेत जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील शेतरस्ते सामोपचारातून अतिक्रमणमुक्त करण्याची लोकचळवळ हाती घेतली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी जाऊन, शेतक-यांसोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावत आहेत. निलंगा येथील तहसीलदार अनुप पाटील यांनी जिल्हाधिका-यांंच्या आदेशानुसार तालुक्यात शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ प्रभावीपणे सुरु केली आहे. यामध्ये औराद मंडळातील वाकसा गावातील अंदाजे 1.5 किमीचे शेतरस्ता मोकळे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.. यामुळे मागील अनेक वर्षांपासून शेत रस्तासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणा-या शेतक-यांना न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS