Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शारदा प्रतिष्ठानच्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी गरजुंनी नोंदणी करावी-अमरसिंह पंडित

गेवराई प्रतिनिधी - शारदा प्रतिष्ठानचा 23 वा सामुहिक विवाह सोहळा मंगळवार, दि.2 मे रोजी सायं. 6.35 वा. जय भवानी मंदिर परिसर, शिवाजीनगर, गढी येथे आय

जयभवानी यंदा सात लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करणार-अमरसिंह पंडित
ग्रामीण भागातील विकासकामे दर्जेदार करू-अमरसिंह पंडित
जयभवानी ऊसाला 2700 रू पेक्षा जास्तीचा भाव देईल-अमरसिंह पंडित

गेवराई प्रतिनिधी – शारदा प्रतिष्ठानचा 23 वा सामुहिक विवाह सोहळा मंगळवार, दि.2 मे रोजी सायं. 6.35 वा. जय भवानी मंदिर परिसर, शिवाजीनगर, गढी येथे आयोजित करण्यात आला आहे. विवाहा सारख्या पवित्र संस्कारावर होणारा वारेमाप खर्च टाळून हुंड्यासह अनेक अनिष्ठ रूढी परंपरा बंद करण्यासाठी शारदा प्रतिष्ठानने सामुहिक विवाहाची चळवळ सुरू केली, समाजातील गरजू विवाह इच्छुक वधु-वरांच्या पालकांनी सोहळ्यासाठी तत्काळ नोंदणी करावी असे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले.
अविरतपणे 23 वर्षे सामुहिक विवाह सोहळ्याचे शिस्तबध्द आणि नेत्रदिपक आयोजन करणारी शारदा प्रतिष्ठान ही मराठवाड्यातील एकमेव संस्था आहे. विवाह सोहळ्यात सहभागी दांपत्यांना संसारोपयोगी साहित्यांचा संच, वधु वरांचा संपूर्ण पोशाख, सोन्याचे मंगळसूत्र, पादत्राणे आदी प्रतिष्ठान कडून दिले जाते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संत महंत यांच्या उपस्थित ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चरात, नेत्रदीपक व आकर्षक रोषणाई मध्ये हा सोहळा आयोजित केला जातो. गरजू वधु-वर पालकांनी उपवर मुलांचे जन्म प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी असे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदा प्रतिष्ठानचा 23 वा सामुहिक विवाह सोहळा मंगळवार, दि.2 मे 2023 रोजी सायं.635ः वाजता जय भवानी मंदिर परिसर, शिवाजीनगर येथे आयोजित केला असुन या सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार्‍या वधु-वरांना शासनाकडून मिळणारी शासकीय अनुदानाची रक्कम सुद्धा दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शारदा प्रतिष्ठानकडून विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नित्य आयोजन केले जाते, सामुहिक विवाह सोहळ्यासह प्रतिष्ठानच्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो, प्रतिष्ठानच्या 23 व्या सामुहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून वधु-वरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.

COMMENTS