Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारधी कुटुंबीयांना हक्काचा  निवारा द्या-डॉ.संजय तांदळे

बीड प्रतिनिधी - जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण स्थळी गेली जवळपास पंधरा वर्षापासून पारधी पवार कुटुंबीयांचा निवारा मि ळण्यासाठी संघर्ष चालू आहे

जोगटेक, खुडुपलेवाडी ग्रामस्थांना निरचक्राचे वाटप
जायकवाडी पाणी प्रश्‍नावर 12 डिसेंबरला कोल्हे कारखान्याच्या याचिकेची सुनावणी 
मनपात जगताप समर्थकांनी गुंडगिरी व धुडगूस घातला : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळेंचा आरोप

बीड प्रतिनिधी – जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण स्थळी गेली जवळपास पंधरा वर्षापासून पारधी पवार कुटुंबीयांचा निवारा मि ळण्यासाठी संघर्ष चालू आहे गेली अनेक वर्षापासून उपोषण स्थळी व तहसीलच्या मागे उघड्यावर  संसार थाटला असून सहा महिन्यापूर्वी उपोषण स्थळी पवार कुटुंबप्रमुखांनी  निवारा मिळण्यासाठी आपला प्राण  सोडलेला आहे तसेच त्या अगोदर काही दिवसापूर्वी  एका महिला भगिनींचा उपोषण स्थळी डिलिव्हरी होऊन तिच्या बाळाचा देखील मृत्यू झालेला आहे सहा महिन्यापूर्वी कुटुंबप्रमुखाची उपोषण स्थळी निधन झाले  असता आम्हाला निवारा द्या अन्यथा आम्ही कुटुंबप्रमुखाचे प्रेत  हलवणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतली असता तत्कालीन जिल्हाधिकारी राधा बिनोद  शर्मा यांनी सामाजिक कार्यकर्ता सह कुटुंबीयाची व संबंधित अधिकार्‍याची एक बैठक घेऊन निवार्‍याबाबतचा सर्वानुमते निर्णय देण्यात आला होता परंतु सहा महिने उलटून गेले असताना देखील प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसून येत नाही सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते व संबंधित अधिकारी देखील इकडे फिरकले देखील नाहीत आजही आम्ही उपोषण स्थळी उघड्यावर रात्र काढत असून आज पासून पावसाची सुरुवात झाली असून आम्ही अशा परिस्थितीत कुठे राहावे हा मोठा प्रश्न आवासून आमच्या पुढे उभा आहे शासनाने कायमस्वरूपी निवारा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा तत्पूर्वी सध्या राहण्यासाठी तात्पुरती निवार्‍याची सोय शासनाने अथवा सामाजिक संघटनेने करावी अशी   मागणी   दिनांक आठ एप्रिल 2023 शनिवार रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय तांदळे यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता पवार कुटुंबीयातील एका प्रमुख महिलेशी संवाद साधत असताना यावेळी त्यांनी केली नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

COMMENTS