Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड च्या सार्वजनिक जयंतीच्या नावाने पैसे गोळा करणारांवर कारवाई करा 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती घेणार एसपींची भेट

बीड प्रतिनिधी - बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला आदर्श घालून दिलेला आहे. राज्यात एकमेव स्वबळावर साजरा होणार

लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
ऐन उन्हाळ्यात मिरचीच्या भावाचा ठसका
पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या

बीड प्रतिनिधी – बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला आदर्श घालून दिलेला आहे. राज्यात एकमेव स्वबळावर साजरा होणारा बीडचा जयभीम महोत्सव आहे. इतर समाजाकडून वर्गणी घेतली जात नाही. त्यामुळे एक आदर्श जयंती म्हणून बीडच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडे पाहिले जाते. मात्र काही लोक सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या नावाने पैसे गोळा करत आहेत. अशा लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजिनक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी पोलीस अधीक्षक बीड यांची भेट घेणार आहेत. असे प्रसिद्धीपत्रक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने काढले आहे.
    बीड शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून जयभीम महोत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी काही लोक कार्यक्रमाची रंगीत निमंत्रण पत्रिका छापून व त्यावर मान्यवर लोकांची नावे टाकून अधिकार्‍यांना पत्रिका देऊन व जबरदस्तीने पैशाची मागणी करून पावत्या फाडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे. तसेच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या नावाने पैसे जमा करण्याचा प्रयत्न करणारांवर कारवाई करावी. अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत संबंधितावर गुन्हे दाखल करावेत व पावती बुक जप्त करण्यात यावे. अशी मागणी घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे शिष्ट मंडळ पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार आहे. या निवेदनात संबधितांनावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तरी समाजाने याची नोंद घ्यावी असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती करण्यात आले आहे.

COMMENTS