Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.देवगांवकर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली डायलेसिस सुविधा

सुसज्ज विभाग डॉ.पार्थ देवगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण सेवेत दाखल

नाशिक ः गेल्या ३० वर्षांपासून रुग्णसेवेचे व्रत जोपासणार्‍या डॉ.देवगांवकर हॉस्पिटलने आपल्या आरोग्य सेवेची व्याप्ती आणखी वाढविलेली आहे. गंभिर स्वरु

माणूसकी ओशाळली
राहता बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद
हिमाचलमध्ये ढगफुटी, शिमल्यात भूस्खलन

नाशिक ः गेल्या ३० वर्षांपासून रुग्णसेवेचे व्रत जोपासणार्‍या डॉ.देवगांवकर हॉस्पिटलने आपल्या आरोग्य सेवेची व्याप्ती आणखी वाढविलेली आहे. गंभिर स्वरुपाचे मूत्रविकार असलेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून डायलेसिस सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करुन देत असल्याची माहिती मूत्रपिंड विकार तज्ज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट) डॉ.पार्थ देवगांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती देतांना डॉ.पार्थ देवगांवकर म्हणाले, डायलेसिस युनिटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले फ्रेसेनिस ४००८ एस हे मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. सोबत पूर्ण वेळ प्रशिक्षित तंत्रज्ञ (टेक्निशियन) देखील रुग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहे. उपचार प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास कमी करण्यासाठी आम्ही मोठ्या व नामांकित आरोग्य विमा कंपन्यांसोबत सामंजस्य करार केलेले आहेत.

एनएबीएच मान्यताप्राप्त देवगांवकर हॉस्पिटल हे ३५ खाटांचे रुग्णालय गेल्या ३० वर्षांपासून रुग्णसेवेत तत्पर राहिलेले आहे. आजवर शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना या रुग्णालयात यशस्वी उपचार करतांना दिलासा देण्यात आलेला आहे. व ही प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. गंभिर स्वरुपाचे मूत्रविकार असलेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून डायलेसिस सुविधा अतिशय अल्प दरात दिली जाणार आहे.

नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टर असलेले डॉ.नारायण देवगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगांवकर हॉस्पिटल रुग्णसेवा देत आहे. नुकतेच हॉस्पिटलचे नुतनीकरण करण्यात आलेले असून, आणखी अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. यामध्ये सुसज्ज असे आयसीयु कक्ष तसेच स्पेशल व डिलक्स रुम या माध्यमातून रुग्णांचा उपचार अधिक सुलभ बनिवण्यावर भर दिलेला आहे. त्यात आणखी भर घालतांना सर्वसुविधांनी युक्त डायलेसिस सेंटरदेखील डॉ.पार्थ देवगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेसाठी दाखल होतो आहे.

डायलेसिसची वाढती मागणी – डॉ.पार्थ देवगांवकर म्हणाले, जीवनशैली किंवा अन्य विविध कारणांनी मूत्रपिंड निकामी होणे किंवा मूत्रपिंडाचे गंभीर स्वरुपाचे आजार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना प्रत्यारोपणासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागते. अवयवदानाबाबत जागृकता होत असली तरी अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तर काही रुग्णांना त्यांची वैद्यकीय स्थिती किंवा अन्य कारणांनी प्रत्यारोपण करणे शक्य नसल्याने अशा रुग्णांना आयुष्यभर डायलेसिसचा आधार घ्यावा लागतो. अशा सर्व रुग्णांच्या जीवनात दिलासा देण्यासाठी देवगांवकर हॉस्पिटल येथे डायलेसिस सेंटर सुरु करत असल्याचे डॉ.पार्थ देवगांवकर यांनी नमूद केले.

COMMENTS