Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इगतपुरी येथे होणार्‍या चर्मकार महासंघाच्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित रहावे-इंजि एन डी शिंदे

अंबाजोगाई प्रतिनिधी - राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्या पुढाकाराने इगतपुरी येथे  राष्

शेतकर्‍यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना  
अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी
शिपाई चालवतो रायमोह जिल्हा बीड येथील दवाखाना | LOKNews24

अंबाजोगाई प्रतिनिधी – राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्या पुढाकाराने इगतपुरी येथे  राष्ट्रीय चर्मकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे. दिनांक 8 व 9 एप्रिल 2023 ,या दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास मराठवाड्यातील सर्व चर्मकार कार्यकर्ते तथा तरुणांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष इंजि एन डी शिंदे यांनी केले आहे.
इगतपुरी येथे दिनांक 8 व 9 एप्रिल 2023 या दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्यासह संपूर्ण भारतातून चर्मकार महासंघाचे समाजबांधव तथा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरात चर्मकार महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याचे अधिकारी, विविध विचारवंत, तसेच महासंघाचे राज्यस्तरीय त्याचबरोबर विभागस्तरीय अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात भरकटत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा दाखवण्यासाठी अनेक जेष्ठ विचारवंत , साहित्यिक यांचे सखोल असे मार्गदर्शन लाभणार आहे . शासनाच्या वतीने चर्मकार समाजासाठी किती व कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात व त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना घेता येईल याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी विविध महामंडळाचे संचालक तसेच अधिकारी उपस्थित राहून सखोल असे मार्गदर्शन करणार आहेत . या प्रशिक्षण शिबिरास संपूर्ण भारत देशातून चर्मकार बांधव हजेरी लावनार आहेत . तेव्हा आपल्या मराठवाड्यातील देखील तमाम चर्मकार समाजबांधवानी या प्रशिक्षण शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष इंजि एन डी शिंदे यांनी समाजातील तरुण युवक तथा युवतींना केले आहे.

COMMENTS