Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव सुमंत भांगेंच्या चौकशीसाठी आजपासून उपोषण

उपोषणस्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता

exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केलेल्या मनमानी कारभार आणि बार

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित
रेल्वेखाली उडी घेत माय-लेकीची आत्महत्या I LOKNews24
बार मालकाकडून माजी नगरसेवकावर हल्ला l LOKNews24
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केलेल्या मनमानी कारभार आणि बार्टी अंतर्गत अनेक योजनांचा गुंडाळल्यामुळे अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढत असून, भांगे यांच्या गैरकारभाराची आणि बेहिशोबी मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाने केली असून, त्यासाठी सिद्धार्थ भराडे आजपासून मंत्रालयासमोर उपोषण करणार आहे. त्यामुळे याठिकाणी विद्यार्थी मोठया संख्येने जमण्याची शक्यता आहे.
सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी बार्टीचे आय.बी.पी.एस. पोलिस भरती प्रशिक्षण बंद करून, 50 हजार विद्यार्थ्यांचे नुकसान केला असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांना स्वाधार योजनेतून पैसे मिळत नाहीत, पी.एचडी. करणार्‍या विद्यार्थ्यांना मदत केली जात नाही. गेल्या दीड महिन्यापासून पी.एचडी करणारे विद्यार्थी फेलोशीपसाठी आंदोलन करत आहे. मात्र त्यांंच्या आंदोलनाकडे लक्ष दिले जात नाही. अनु. जाती कायदा प्रतिबंधात्मक योजनेतील अन्यायग्रस्त लोकांना निधी मिळत नाही. विद्यार्थ्यांचे निर्वाह भत्त्याचे पैसे दिले नाहीत, साहित्य दिले जात नाही. विभागातील शासकीय निवासी शाळांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असून त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल अनास्था दाखविली आहे. सामाजिक न्याय विभागातील वर्ग-1 व वर्ग-2 तसेच इतर अनेक महत्वाची पदे रिक्त असून त्या रिक्त जागा भरण्याबद्दल अनास्था दिसून येते. विभागातील शासकीय मुलींच्या वसतीगृहातील महिला गृहपाल, अधीक्षक यांची पदे रिक्त असल्यामुळे एकेक महिला अधीक्षक गृहपाल यांच्याकडे अनेक अतिरिक्त वसतिगृहांचा कार्यभार सोपवून काम करण्यात येत आहे. परिणामी विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. याकडेही त्यांनी दुलर्क्ष केले असल्याचे दिसून येते.

शासकीय गाडीचा ‘या’ त्रिकुटांकडून गैरवापर – सचिव सुमंत भांगे यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाबरोबरच सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे त्यांच्याकडे दोन्ही विभागांच्या शासकीय गाडया आहेत. मात्र यातील सामाजिक न्याय विभागाची शासकीय गाडीचा वापर खुद्द सुमंत भांगे करतात. तर दुसर्‍या शासकीय गाडीचा त्यांचे हस्तक राऊत, सुर्वे आणि बांगर करतात. त्यांना मंत्रालयात प्रवेश कसा मिळतो, ते थेट शासकीय गाडीचा वापर कसा करतात. हे तिघेही त्रयस्थ व्यक्तींचे कामे घेवून थेट कक्ष अधिकार्‍यांसह इतर अधिकार्‍यांवर दबाव निर्माण करून कामे करून घेत असल्याचा आरोप देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाने केला आहे. शिवाय या त्रयस्थांकडून मोठी टक्केवारी घेत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे या त्रिकुटांची मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांकडून चौकशी होण्याची गरज आहे.

केवळ 40 टक्केच निधी खर्च – वास्तविक पाहता सामाजिक न्याय विभागाचा निधी हा घटनात्मक तरतुदीने मान्य करण्यात आला असून त्यास 100 टक्के लाभार्थ्यांच्या विकासावर खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांचा अर्थ विभागाशी समन्वयाच्या अभावामुळे सदर निधी 100 टक्के अजूनपर्यंत खर्च झालेला नाही. भांगेंच्या भोंगळ कारभारामुळे यावर्षी फक्त 40 टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरीत निधी व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

COMMENTS