Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारे आमदार शिरसाटांवर ठोकणार तीन रूपयांचा दावा

पुणे/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात अब्रुनुकसानीचा द

सुषमा अंधारेंची 40 भावांना राखी बांधण्याची इच्छा
व्यसनातून पिढी बरबाद होऊ नये – सुषमा अंधारे 
संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी थंड का पडली? 

पुणे/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे केवळ तीन रुपयांचा हा दावा असेल. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटकपक्ष आक्रमक झालेत.
आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली होती. ते म्हणाले होते की, ’ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत म्हणते. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची 38 वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याबद्दल सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करावी. त्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्यात. मात्र, अजूनही तरी पोलिसांनी अहवाल सादर केल्याचे वृत्त नाही. या प्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. संजय शिरसाट वक्तव्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासासाठी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या महिला अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. संजय शिरसाट यांच्या भाषणाची क्लीप तपासली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यातील ’लफडं’ हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का, याचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. आमदार संजय शिरसाट आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. आपण सुषमा अंधारे यांच्याबद्दल एकही अश्‍लील शब्द बोललो नाही. असा शब्द बोलल्याचे निदर्शनास आणून दिल्यास आमदारकीचा राजीनामा देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. सुषमा अंधारे या मंत्री अब्दुल सत्तार, गुलाराव पाटील यांना त्यांच्या मतदार संघात जाऊन शिव्या देतात. मात्र, आम्ही केवळ त्या महिला म्हणून गप्प बसायचे का? असा सवाल त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी संजय शिरसाट यांच्या वर्मावर बोट ठेवून काही प्रश्‍न विचारलेत. त्या म्हणाल्या की, शिरसाट हे विकृत प्रवृत्तीचे नाव आहे. असे राजकारणी नेहमीच महिलांबद्दल असभ्य बोलतात. यातून त्यांची वैचारिक लायकी दिसते. मुळात शिरसाटांनी अंतरंगात डोकावून पाहत या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत. संभाजीनगरमध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला आमदार संजय शिरसाट का अडकवू पाहत होते शिरसाटांकडे 72 कोटी रुपये आले कुठून? त्यांना ब्लॅकमेल करून यातून 5 कोटी मागणारी कोण होती? आठ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये 72 व्या मजल्यावर शिरसाट यांनी कुणासाठी कोट्यवधींचा फ्लॅट घेतला. दोन महिन्यांपूर्वी शिरसाट यांना हार्टअटॅक आल्याने मुंबईला नेण्याचे नाटक झाले, ते प्रकरण नेमके काय, असा सवाल त्यांनी केला आहे.

COMMENTS