Homeताज्या बातम्यादेश

धीरेंद्र शास्त्रीचं वादग्रस्त वक्तव्य

आपल्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा एक धक्कादायक वक्तव्य क

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार
मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत अखेरची संधी
मोहिनीनगरला घरफोडीत 16 हजाराचा ऐवज चोरीस

आपल्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या नावाची महाराष्ट्रात भरपूर चर्चा झाली होती. दिल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या नावाची महाराष्ट्रात भरपूर चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या कथित चमत्कारावर वाद सुरू असतानाच त्यांनी संत तुकाराम महाराज  यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिर्डीच्या साईबाबांविषयी  वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जबलपूरच्या पनगर येथे श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी लोकांशी संवाद साधताना पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना साईबाबांबद्दल भाष्य केले. “आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही आणि शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट पाळणे हा प्रत्येक सनातनीचा धर्म आहे. कारण ते आपल्या धर्माचे प्रमुख आहेत.  कोणताही संत, मग तो गोस्वामी तुलसीदास जी असो वा सूरदास जी, तो संत, महापुरुष, युगपुरुष, युगपुरुष असतो. पण देव नसतो. लोक यावरुन वाद घालतील, पण हे सांगणेही अत्यंत गरजेचे आहे की, कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही,” असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले

COMMENTS