Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी पाळणा गात केला श्रीराम जन्मोत्सव साजरा

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः दरवर्षी प्रमाणे नेवासा प्रभागात असलेल्या अहिल्यानगर  या ठिकाणी असलेल्या  हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राचा रामनवमी जन्म

चाळीस हजारांची लाच घेतांना महिला सरपंचासह पतीस अटक
निपाणी-निमगाव ते वाटापूर रस्त्याच्या कामाला सुरूवात
Sangamner : बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली टीका

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः दरवर्षी प्रमाणे नेवासा प्रभागात असलेल्या अहिल्यानगर  या ठिकाणी असलेल्या  हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राचा रामनवमी जन्मोत्सव महिला सुवासिनींनी पाळणा व भजने गाऊन भक्तिमय व मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने  रामनवमीच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून ते  दुपारी 12 वाजेपर्यंत अहिल्यानगर येथील महिला सुवासिनींनी एकत्रित येत पुष्पांनी पाळणा सजवून प्रभू श्रीराम चंद्राच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.यावेळी सजविण्यात आलेल्या पाळण्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती विभूषित अलंकार घालून प्रतिमा ठेवण्यात आली. यावेळी राम जन्मला ग सखे राम जन्मला हे भक्तीगीत गाऊन पुष्पवृष्टी करून दुपारी 12 वाजता जन्मोत्सव साजरा केला.पाळण्याची दोरी ओढून पाळणा म्हणण्यात आला. यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी संतसेवक रखमाजी नाचन,समाजसेवक सुधीर वाघ,नगरसेवक जितेंद्र कु-हे,पशुधन अधिकारी डॉ.विलास राऊत,मुनोत साहेब, पुंड भाऊसाहेब, बाबासाहेब बुचुडे,डॉ.चव्हाण,शितल वाकचोरे, आदर्श शिक्षिका सौ. सिंधुताई नलभे,सौ.सुनीताताई राऊत, सारिका वाघ,मीरा गवळी मनिषा गवळी,सुषमा सुर्यकर,सिंधूताई शूळ,सौ.मीराताई नाचन,सौ.मंदाताई जोशी,सौ.कोयल शर्मा, सौ.उज्वला मते,सौ.शोभाताई बुचुडे,अनिता गवळी,सगुणाबाई कडू, सौ.वैशाली ताठे,पुष्पा दळे,गीता खरात,अक्षदा गवळी, वंदना कदम, निशिगंधा दळे,प्रणिता शूळ,केशर जर्‍हाड ज्योती पुंड यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS