छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटामध्ये झालेल्या राडयानंतर शहरातील वातावरण पूर्वपदावर आले आहे. त्यातच महाविकास आघाडीकडू
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटामध्ये झालेल्या राडयानंतर शहरातील वातावरण पूर्वपदावर आले आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र रामनवमीच्या आदल्या दिवशी संभाजीनगरमध्ये झालेल्या हाणामारी आणि वाहन जाळपोळीच्या घटनेनंतर आता या सभेला परवानगी मिळेल की नाही, असा प्रश्न उद्भवला आहे. यातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमधल्या किराडपुरा शहरामध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यानंतर हाणामारी आणि वाहनांची जाळपोळही झाली. त्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार की नाही, याबद्दल गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंग्यानंतर आता सभा होणार का? असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारला. मविआच्या सभेमुळे वातावरण बिघडत असेल, तर सभा थांबवू. पोलिसांनी काही रिपोर्ट दिल्यास किंवा सभेमुळे काही प्रश्न निर्माण होणार असतील तर प्रशासन परवानगी देणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेतल्या जाणार आहे. त्यातली ही पहिलीच सभा असणार आहे. गिरीश महाजन यांच्या विधानानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे लक्ष लागलेलं आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे.
COMMENTS