Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करा

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले असून, कॅगच्या अहवालानंतर भाजप नेते आशिष शेलार यां

भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी कायमची संपवण्यासाठी ढब्बू मकात्या सत्यांजली अभियान
फोनवर मोठ्याने बोलल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये राडा
बीडमध्ये तलवार व सुरा घेऊन फिरणार्‍याला पकडले

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले असून, कॅगच्या अहवालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कॅगने आपल्या चौकशीत मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. त्यामुळे 8,485 कोटींचा भ्रष्टाचार उघड झाले असून या मागचा सुत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या 9 विभागातील 76 कामांमधील 12 हजार कोटींच्या घोटाळयावर कॅगने ताशेरे मारले आहेत. ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते त्याचे वर्णन करायचे तर कट, कमिशन आणि कसाई असे करता येईल, असा घणाघाती आरोप देखील शेलार यांनी केला आहे. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला असून, ही जनतेच्या पैशांची लूट असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. कॅगचा अहवाल हा केवळ 28 नोव्हेंबर 2019 ते 31 आक्टोबर 2022 या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ 76 कामांमध्ये 8485 कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, या प्रकरणी फौजदारी दंड संहिता अंतगर्त एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, आमदार ड शेलार यांनी केली आहे. परेल टीटी उड्डाण पुल, मिठी नदी अशा वरळी, वांद्रे मातोश्री जवळची अनेक कामे निविदा न काढता, नियम न पाळता देण्यात आली. म्हणून या सगळयाची एसआयटी चौकशी व्हावी, सूत्रधार कोण, हे उघड व्हायला हवे अशी मागणी त्यांनी केली आहे. शेलार यांच्या या मागणीमुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

चार कंपन्या सांगून एकाच कंपनीला टेंडर – मुंबई महानगर पालिकेतील कामांची पोलखोल होत असून, यामध्ये टेंडरविना काम असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर टेंडरपेक्षा जास्त कामे दिली आहे. टेंडर पडताळणी विना, टेंडर अपात्र असलेल्यांना कामे दिली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यातून टक्केवारीचा घोळ समोर येण्याची शक्यता आहे.  काही ठिकाणी चार कंपन्या सांगून टेंडर दिले पण ती एकच कंपनी आहे. हा टेंडर अटी शर्तीचा भंग आहे, टेंडरमध्ये फेरफार आहे. कुठल्याच सरकारमध्ये झाला नसेल इतका मोठा हा घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सॅपमध्ये टेंडर फेरफार झाला आहे. त्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा शेलार यांनी केला आहे.

COMMENTS