Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एन डी आर एफ यूनिट ५ पुणे यांनी जालन्यात दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे 

जालना प्रतिनिधी - आपत्तीच्या काळात जिल्ह्यांत बचाव करण्यासाठी एन डी आर एफ पुणे यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दोन

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे
मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य
अनिल परब यांच्या दापोली येथील रिसोर्टवर हातोडा

जालना प्रतिनिधी – आपत्तीच्या काळात जिल्ह्यांत बचाव करण्यासाठी एन डी आर एफ पुणे यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण व रंगित तालिम आयोजित करण्यात आले. यावेळी आपत्तीच्या वेळी शासनाचे विविध विभाग एक दूसऱ्यांशी कसे समन्वय साधतील व सामान्य जनतेला आपत्तीच्या काळात मदत होईल व कमीत कमी जिवीत हानी होईल याचे प्रशिक्षण दिले. कमीत कमी साधनात कशी मदत होईल व रोजच्या वापरातील वस्तुंचा वापर करून आपला जिव कसा वाचवता येईल पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, सर्मोकोल, घरातील पाण्या घागरी आश्या वस्तूचा वापर करून पाण्यावर कसे तरंगता येते व पुरपरिस्थीत किंवा आपत्तीच्या काळात आपला जिव वाचेल याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बुडत असलेल्या व्यक्तीला पाण्यातून कसे बाहेर काढायचे दोरीच्या साहाय्याने कशी मदत करायची त्याचा व आपला जिव कसा वाचवता येईल याचे प्रशिक्षण करून दाखविले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके , एन डी आर एफ यूनिट पाच चे निरीक्षक महिंद्र पुनिया , अधिकारी,  तहसीलदार , पोलिस अधिकारी , आरोग्य अधिकारी , विद्युत वितरण कर्मचारी , होमगार्ड , अग्नीशामक चे कर्मचारी आपत्तीच्या व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. 

जालन्यातील मोती तलाव येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले एन डी आर एफ कडून बचाव आंतर्गत विवीध साहित्य उपयोग करून शोध व बचावाबाबत रंगीत तालीम देखिल घेण्यात आली  एन डी आर एफ युनिट पाचचे बिस ते बावीस अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिले. 

COMMENTS