Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

२०१९ ला मंत्री असतो तर आत्तापर्यंत हक्काचे ७ टिएमसी पाणी आले असते – तानाजी सावंत 

धाराशिव प्रतिनिधी - मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नाला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक दिला. मी २०१९ ला मंत्री असतो तर आत्ता पर्यंत ७ टीएमसी पाण

कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणी दोन्ही गटातील आठ आरोपींना अटक  
युगप्रवर्तकांस …
क्षुल्लक कारणावरुन एसटी ड्रायव्हर आणि कंटक्टरला जबर मारहाण.

धाराशिव प्रतिनिधी – मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नाला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक दिला. मी २०१९ ला मंत्री असतो तर आत्ता पर्यंत ७ टीएमसी पाणी आल असत. पण ठीक आहे. काम गतीने चालू असल्याने एप्रील – मे २०२४ पर्यंत येईल असे अश्वासन राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी देवांग्रा येथे बोलताना दिले. सावंत प्रतिष्ठाणच्या वतीने बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना टप्पा दोन राबविण्यात येत असुन भूम तालुक्यातील देवांग्रा नदी खोलीकरणाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे , माजी आमदार राहुल मोटे , डॅा पद्मसिंह पाटील , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता टिका केली. तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम -सुफलाम करून शेतकरी सक्षम करणे हा आपला उद्देश आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवजलक्रांती असे म्हटले. 

COMMENTS