Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत कांजूरमार्गमधील आगीत पाच महिला जखमी

मुंबई ः मुंबईतील कांजूरमार्गमधील कर्वेनगर येथील म्हाडा कॉलनीतील इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत पाच महिलांचा श्‍वास गुदमरल्याने त्यांना

भारतीयांना तात्काळ युक्रेनमधून बाहेर पडा
शिवसेनेत भूकंप ; सरकार कोसळणार ; एकनाथ शिंदे यांच्यासह 33 आमदारांचे बंड | DAINIK LOKMNTHAN
मराठा आरक्षणासाठी कोपरगावात बेमुदत आमरण उपोषण सुरू

मुंबई ः मुंबईतील कांजूरमार्गमधील कर्वेनगर येथील म्हाडा कॉलनीतील इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत पाच महिलांचा श्‍वास गुदमरल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या तीन गाडयांनी आग नियंत्रणात आणली. कांजूरमार्ग पूर्व येथे कर्वे नगर याठिकाणी असलेल्या म्हाढाच्या 14 मजली इमारतीला इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे रविवारी सकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश आले. ही आग इलेक्ट्रिक वायरिंगपर्यंतच मर्यादित होती. तळमजल्यावरील कॉमन इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि ग्राउंड प्लसवरच्या 14 मजल्यांच्या निवासी इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग मर्यादित होती. या आगीवर सकाळी 10 वाजता पूर्णपणे नियंत्रणात आली असून, जखमीमध्ये  विमल जालिंदर साकटे (वय 74) अल्का साकटे (वय 40), नताशा साकटे (वय 13), अंजली मालवणकर (वय 60), करुणा उबाळे (वय 65) यांचा समावेश आहे.

COMMENTS