अहमदनगर जिल्ह्यात  नव्या ३७८० बाधितांची रुग्ण संख्येत भर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात नव्या ३७८० बाधितांची रुग्ण संख्येत भर

जिल्ह्यात आज  ३२२५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ९३८ इतकी झाली आहे.

तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्‍यांनी आर्थिक प्रगती करावी
राज्य सरकारने तृतिय पंथीयांना देखील मदत करावी – विक्रम राठोड
कर्जतचे भूमिपुत्र हवालदार हिंमत जाधव यांचे अकाली निधन

अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३२२५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ९३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ३०२ इतकी झाली आहे. 

 जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९९९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११०१ आणि अँटीजेन चाचणीत १६८० रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०७, अकोले ६४, जामखेड १०७, कर्जत ६१, कोपरगाव ४७, नगर ग्रामीण ३९, नेवासा ४४, पारनेर ८७, पाथर्डी ४६, राहता ६९, राहुरी ०९, संगमनेर ९२, शेवगाव ३७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट बोर्ड २६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५०१, अकोले ११, जामखेड ०३, कर्जत १३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १२२, नेवासा १८,  पारनेर ०५, पाथर्डी २७, राहाता ९७,  राहुरी २३, संगमनेर १३३, शेवगाव २१, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ६७, कॅंटोन्मेंट बोर्ड २७ आणि इतर जिल्हा ११ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १६८० जण बाधित आढळुन आले. मनपा २६२, अकोले ४०, जामखेड २८, कर्जत ६३,  कोपरगाव ९३, नगर ग्रामीण २१५, नेवासा १८४, पारनेर ९३,  पाथर्डी ३५,  राहाता १४१, राहुरी १५१, संगमनेर ७२, शेवगाव ८१ श्रीगोंदा १३९, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट बोर्ड २६ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८६६, अकोले १३६, जामखेड ४८, कर्जत २३४,  कोपरगाव १५०, नगर ग्रामीण ३३५, नेवासा ९५, पारनेर ९६, पाथर्डी ९८, राहाता २७२, राहुरी १८४, संगमनेर १८४,  शेवगाव १६४,  श्रीगोंदा ४५,  श्रीरामपूर १८८, कॅन्टोन्मेंट ६२, मिलिटरी हॉस्पिटल १३ आणि इतर जिल्हा ५५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

COMMENTS