Homeताज्या बातम्या

शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले

Devendra Fadanvis : राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही? | LOKNews24
वक्फ से उम्मीद है !
समन्वयाच्या अभावामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण; जेसीबी चालकावर हल्ल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकर्‍यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकर्‍यांचं सरकार आहे, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुक्रवारी सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकार्‍यांशी  बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS