Homeताज्या बातम्याविदेश

न्यूझीलंडमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

न्यूझीलंड प्रतिनिधी - न्यूझीलंड मध्ये गुरुवारी १६ मार्च ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्

मंत्री भुजबळांच्या बेनामी संपत्तीच्या तक्रारी रद्द
Solapur : या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे (Video)
पत्रकार बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ; जामीन अर्ज फेटाळला | DAINIK LOKMNTHAN

न्यूझीलंड प्रतिनिधी – न्यूझीलंड मध्ये गुरुवारी १६ मार्च ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) या जगातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार न्यूझीलंडच्या केर्मेडेक बेटांवर ७.० तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचं केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर आत असल्याचंही सांगण्यात आलं. यानंतर त्या ठिकाणी त्सुनामीचा अलर्टही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर पर्यंतच्या अंतरात त्सुनामी येऊ शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्थान आणि सीरियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. भूकंप खूप जोरदार होता की रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.८ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्थानच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. हे सीरिया आणि तुर्कस्थानच्या सीमेवर आहे. अशा स्थितीत या भूकंपामुळे दोन्ही देशांत प्रचंड नुकसान झालं. यामध्ये ४४ हजार लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोकांची घरंही उद्ध्वस्थ झाली होती.

COMMENTS