Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नैसर्गिक फुलापेक्षा चायनीज फुलाला मार्केटमध्ये अधिक मागणी

टिकाऊ असल्याने चायनीज फुल खातायत भाव

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - शहरातील फुल बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देशी-विदेशी फुले विक्रीसाठी येत आहे. गुलाबाच्या नैसर्गिक फुलाला बा

औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  
आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका
शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – शहरातील फुल बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देशी-विदेशी फुले विक्रीसाठी येत आहे. गुलाबाच्या नैसर्गिक फुलाला बाजारपेठेमध्ये कमी मागणी आहे आणि गुलाबाच्या भाव देखील जास्त आहे. नैसर्गिक गुलाब हा दिवसभरामध्ये सुकून जातो, त्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी कमी आहे. याविरुद्ध चायनीज फुल हे तीन ते चार दिवस टिकते सुकून जात नाही किंमतही कमी आहे यामुळे सध्या या फुलांना बाजारपेठेमध्ये मागणी जास्त आहे. नागरिकही सत्कार समारंभ यासाठी त्याचा जास्तीचा उपयोग करत आहेत. चायनीज फुल जरा बरा, व्हाईट ड्च, च्रिप्टो हे फुल बाजारात उपलब्ध आहेत. चायनीज फुल स्वस्त मिळत आहे, नैसर्गिक फूल घेण्यासाठी गेले तर दहा रुपयाला मिळते आणि चायनीज फुल पाच रुपयाला, परिणामी चायनीज फुलाला  मागणी वाढल्याचे पाहायला मिळते. 

COMMENTS