Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक लाख रुपये न दिल्यास अश्‍लिल फोटो व्हायरल करेल

युवतीला धमकी देणार्‍याविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः एक लाख रुपये न दिल्यास मुलीचा अश्‍लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी सायबर पो

पंतप्रधान मोदींना पाठवल्या नगरमधून शेणाच्या गोवर्‍या
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तातडीने शिक्षा देण्याचा स्वतंत्र कायदा करावा – बाळासाहेब सानप
कवाद पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यशस्वी उमेदवारांचा गौरव

अहमदनगर/प्रतिनिधी ः एक लाख रुपये न दिल्यास मुलीचा अश्‍लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून 9730658384 या मोबाईल नंबर धारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही उपनगरात राहत असून फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 12 मार्च रोजी रात्री साडेनऊ ते दि. 13 मार्च रोजी साडेबारा दरम्यान मोबाईल क्रमांक 9730658384 यावरून पीडित मुलीस फोन करून व तिचा व्हॉटसअ‍ॅप नंबर हॅक करून त्यावर अश्‍लिल फोटो डीपी म्हणून अपलोड केला. हा फोटो डिलीट करण्यासाठी फिर्यादीने विनंती केली असता संबंधित मोबाईल धारकाने सांगितले की, तुमच्या मुलीचे अश्‍लिल फोटो व व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तुम्ही मला 1 लाख रुपये द्या नाही तर सदरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि खंडणी मागितली. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

COMMENTS