Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लालबागमध्ये तरुणाची हत्या, गुन्हा दाखल

मुंबई : लालबागमध्ये दोरीने गळ्याला फास लावून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून

काय आहे वटपोर्णिमेची महिती.. ? का साजरी केली जाते वटपौर्णिमा ? जाणून घ्या.. LokNews24
तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, ०२ जून २०२२ | LOKNews24
नाशिकरोडच्या बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलची दुरावस्था निवेदनाचे पाढे गाऊनही मनपा निगरगठ्ठच 

मुंबई : लालबागमध्ये दोरीने गळ्याला फास लावून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात काल हत्येचा गुन्हा दाखल केला. मसूदमिया ऊर्फ मासूममिया रमझान सरकार (19) असे मृत तरुणाचे नाव आहे. मसूदमियाचा भाऊ मुजाहिद सरकार याच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मसूदमिया याचा मृतदेह चैत्य इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील खोलीत सापडला. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे त्याला मारण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS