Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात अमुल डार्क चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या

अकोला ः शहरातील हरिहर पेठ येथील बंटी मुरलीधर सटाले यांनी जुने शहरातील एका अमुल कंपनीच्या नावाजलेल्या कंपनीच्या शॉप मधून अमुल डार्क हे चॉकलेट विकत

तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, १९ मार्च २०२२ l पहा LokNews24
दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा
जगदीश पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान 

अकोला ः शहरातील हरिहर पेठ येथील बंटी मुरलीधर सटाले यांनी जुने शहरातील एका अमुल कंपनीच्या नावाजलेल्या कंपनीच्या शॉप मधून अमुल डार्क हे चॉकलेट विकत घेतले. घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला चॉकलेट दिले असता. मुलाने पॅकेट बंद असलेले चॉकलेट वडिलांना काढून मागितले. वडिलांनी ते चॉकलेट काढून दिले. त्या चॉकलेटची पाहणी केली असता त्या चॉकलेटमध्ये अक्षरशः जिवंत अड्या निघाल्या. त्यांनी चॉकलेटच्या पॉकेटवर एक्सपायरी झालेले चॉकलेट तर दिले नाही ना? याची पडताळणी केली असता त्या चॉकलेटची एक्सपायरी अद्याप बाकी असून सुद्धा त्या चॉकलेटमध्ये अळ्या कशा निघाल्या असा प्रश्‍न त्यांना पडला. त्यांनी तात्काळ अमुल कंपनीला तक्रार केली असून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी बंटी मुरलीधर सटाले यांनी केली आहे. तरी लहान मुलांना चॉकलेट देतांना चॉकलेटची एक्सपायरी तारीख तसेच चॉकलेट खाण्यायोग्य आहे की नाही याची पडताळणी करणे गरजेचे आहे.

COMMENTS