Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये टीव्ही मालिकेच्या सेटला भीषण आग

मुंबई प्रतिनिधी - 'गुम हैं किसी के प्यार मैं' या हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म

साकीब अल हसनचा वारसा चालविण्यास मेहदी हसन मिराज सज्ज
केंद्रीय मंत्री गडकरींना धमकी देणार्‍याचे आता पोलिसांना आव्हान
सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीसाठी पोलिस सरंक्षण द्या

मुंबई प्रतिनिधी – ‘गुम हैं किसी के प्यार मैं’ या हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये मालिकेचा भव्य सेट आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही आग लागली. ‘गुम है किसी के प्यार मैं’ या मालिकेच्या सेटच्या आजूबाजूला अनेक मालिकांचे छोटे छोटे सेट देखील होते. पहिल्यांदा ‘गम है किसी के प्यार में’ च्या सेटला आग लागली. बघता बघता आग पसरत गेली आणि शेजारी असलेले इतर 3 ते 4 सेट आगीच्या भक्ष्य स्थानी सापडले. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनदलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.   या आगीत सुदैवानं कोणाला दुखापत झालेली नाही. मालिकेतील सगळे कलाकार आणि कर्मचारी सुखरूप आहेत. या भीषण आगीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

COMMENTS