छत्रपती संभाजीनगर ः औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतराचा निर्णय झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज
छत्रपती संभाजीनगर ः औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतराचा निर्णय झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. काल संध्याकाळी कॅडल मार्च काढण्यात आला. या कॅडल मार्चला पोलिसांची परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही जलील यांनी कँडल मार्च काढल्याने त्यांच्यासह 1500 जणांवर शहरातील सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात शहरात वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा भाग काल औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने गुरुवारी शहरात कँडल मार्च काढण्यात आला होता. खासदार इम्तीयाज जलील यांच्यासह औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अय्युब जहागीरदार, महमुझ उर्रहमान फारुकी, आरेफ हुसैनी, फेरोज खान, नासेर सिद्दीकी, मोहम्मद समीर बिल्डर, शकुर सालार, शारेक नक्षबंदी, कुनाल खरात, प्रांतोष वाघमारे, गंगाधर ढगे, गाजी सादोद्दीन उर्फ पप्पु कलानी, सलीम सहारा, वाजीद जहागीरदार, काकासाहेब काकडे, रफीक चिता, जमीर कादरी, मुंशी पटेल, रफत यारखान, नुसरत अली खान, हाशम चॉऊस, अबुल हसन हाशमी, परवेज अहमद, शकुर अहमद, बाबा बिल्डर, मोबीन अहमद, शोएब अहमद व औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती पदाधिकारी तसेच इतर 1000 ते 1500 बेकायदेशिर जमाव यांचे विरुध्द कलम 143 भा.दं.वि. व म.पो. का. 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS