Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बायकोला कॉल का केला ? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवर केला प्राणघातक हल्ला

  धुळे प्रतिनिधी - माझ्या बायकोला वारंवार कॉल का करतो? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या धुळे शहरातील शंभर फुटी रस्त्यावर राहणाऱ्या असिफ अन्स

‘संसद मार्च’साठी शेतकरी आक्रमक
जागर वाचनाचा उपक्रमामुळे वाचन चळवळ बळकट
महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकवला मानाचा हिंदकेसरी किताब  

  धुळे प्रतिनिधी – माझ्या बायकोला वारंवार कॉल का करतो? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या धुळे शहरातील शंभर फुटी रस्त्यावर राहणाऱ्या असिफ अन्सारी याला तेथेच राहणाऱ्या गुफरान पोपटवला याचा जावई जावेद टेलर आणि त्याच्या काही मित्रांनी असिफ अन्सारी याला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. या घटनेवरून धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील शंभर फुटी रोडवर राहणाऱ्या आसीफ अन्सारी याच्या पत्नीला काही कारण नसताना कॉल करणारे गुफरान पोपटवला याचा जावई जावेद टेलर, अबुजार अन्सारी, नईम ड्रायव्हर, आलम टेलर, अझीम अन्सारी ह्या लोकांना आसिफ याने विचारणा केली असता, आपण या विषयासंदर्भात बसून बोलून असे सांगून धुळे शहरातील गरताड बारी जावळी हॉटेल फाय जवळ सुम साम परिसरात घेऊन जाऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आसिफ अन्सारी याला एका अज्ञातस्थळी घेऊन गेले असल्याची माहिती मिळताच त्याचा मोठा भाऊ तोशिफ अन्सारी हा लागलीच घटनास्थळी दाखल झाला. त्याने आपल्या भावाला मारहाण करीत असलेल्या तरुणांचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. मारहाण करीत असलेल्या सर्वांचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केल्यानंतर त्यातील एका जणाचे लक्ष तोसीफ याच्यावर गेले त्याने लागलीच तोसीफ याच्यावर देखील हल्ला चढवीत त्याच्याकडे असलेला मोबाईल हिसकावून घेत त्याला देखील जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या झालेल्या या हल्ल्यात आसिफ अन्सारी याचा मित्र समीरच्या मानेवर चाकूने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आणि असिफ अन्सारी यांच्यावर सध्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय उपचार सुरू आहे. तसेच हल्लेखोर यांच्याकडून आसिफ अन्सारी आणि त्यांच्या परिवाराला केस जर केली तर तुम्हाला बघून घेऊ अशी जीवे ठार मारण्याची धमकी गुफरान पोपटवला यांच्या मुलाकडून आणि जावाई कडून देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. हल्ले करणाऱ्यांवर तात्काळ पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी आसिफ अन्सारी व त्याच्या परिवाराने केली आहे.

COMMENTS