मुंबई : येथील सुप्रसिद्ध प्राचीन बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला भेग पडली आहे. बाबुलनाथला अभिषेक करण्यास भाविकांना मंदिर प्रशासनाने मनाई केली आहे.
मुंबई : येथील सुप्रसिद्ध प्राचीन बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला भेग पडली आहे. बाबुलनाथला अभिषेक करण्यास भाविकांना मंदिर प्रशासनाने मनाई केली आहे. आयआयटी मुंबईच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये भेसळयुक्त अबीर, गुलाल, भस्म, कुंकू, चंदन, दूध अर्पण केल्याने शिवलिंगाला भेग पडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अभिषेकावेळी पाण्याव्यतिरिक्त अन्य सर्व पदार्थांना मनाई करण्यात आली आहे.
श्री बाबुलनाथ मंदिर धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष नितीन ठक्कर यांनी सांगितले की, कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत असल्याचे मंदिराच्या पुजार्यांच्या लक्षात आले आहे. त्यानंतर मंदिर ट्रस्टने आयआयटी मुंबईकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. मंदिर प्रशासनाकडून आयआयटी मुंबईची टीम शिवलिंगाच्या संवर्धनाबाबत सल्ला देणार आहे. या महिन्यात अहवाल येणे अपेक्षित आहे. बाबुलनाथ मंदिरावर मुंबईकरांची श्रद्धा आहे. शिवलिंगाबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत आणि ते जतन करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली जातील. बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सुप्रसिद्ध शिवमंदिर असून, राजा भीमदेव यांनी हे मंदिर बाराव्या शतकात बांधले आहे. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते, मात्र, 1780 मध्ये मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
COMMENTS