Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसला गटबाजीचे ग्रहण

राज्यात सध्या काँगे्रसने नव्या जोमोने संघटन वाढवण्याची गरज असतांना, काँगे्रसमधील गटबाजी चव्हाटयावर येतांना दिसून येत आहे. नाशिक पदवीधरपासून सुरु

कसोटी शिवसेनेसह शिंदे गटाची
कर्नाटक भाजपमधील बंडाळी
फसव्या जाहिराती आणि ग्राहक

राज्यात सध्या काँगे्रसने नव्या जोमोने संघटन वाढवण्याची गरज असतांना, काँगे्रसमधील गटबाजी चव्हाटयावर येतांना दिसून येत आहे. नाशिक पदवीधरपासून सुरु झालेले ग्रहण अजूनही काही संपण्याची चिन्हे नाहीत. नाशिक पदवीधर निमित्ताने आमदार सत्यजित तांबे यांनी थेट काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केल्यानंतर काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर झालेली मनोमिलन, आणि नुकतेच काँगे्रसचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सुरु होत असतांनाच, विदर्भातील काँगे्रसच्या 24 नेत्यांनी नाना पटोले यांना काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षापदावरून हटवा अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. नाना पटोले ओबीसी नेते असून, ते आक्रमक नेते म्हणून देखील परिचीत आहे. अशावेळी त्यांची विकेट घेण्यासाठी पक्षातीलच नेते आसुसलेले दिसून येतात. विशेष म्हणजे पटोले यांची कार्यशैली विषयी अनेक तक्रारी आल्या असल्या तरी, त्यांनी निवडणुकीत पक्षाला मिळवून दिलेल्या यशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विधानपरिषदेच्या पाच जागापैकी तांबे यांना ग्रहित धरले तर तीन जागेवर काँगे्रस विजयी झाला आहे. कोकणाच्या जागेवर भाजप तर, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी विजयी झाली आहे. नागपूर आणि अमरावती विदर्भातील मतदारसंघात काँगे्रसचे यश कौतुकास्पद आहे. नागपूर भाजपचा बालेकिल्ला असतांना, पटोले यांनी ज्या त्वेषाने या जागा पक्षाला मिळवून दिल्या, त्यामुळे पक्षात त्यांचे वजन वाढायला हवे होते. मात्र स्थानिक नेते त्यांच्याविरोधात कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. वास्तविक विजयासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक आहे, त्या पटोले करतांना दिसून येत आहे. पुण्यातील कसबा पोटनिवडणूक होत आहे. या हा मतदारसंघ देखील भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र या मतदारसंघात काँगे्रसने पूणर्र् ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चमत्कार घडू शकतो. अशावेळी पटोले यांचे खच्चीकरण करणे म्हणजे महाराष्ट्रातील काँगे्रसला रसातळाला घेऊन जाण्याचा प्रकार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षात गटबाजी निर्माण केली आहे. नाना पटोले यांच्यामुळेचं काँग्रेसची मुख्य व्होटबँक असलेले दलित, मुस्लीम आणि आदिवासी यांना पक्षात दूर करण्यात आले आहे. नाना पटोले हे पक्षात मनमानी करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील नानागिरी सुरू असल्याचा दावा शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांनी केला आहे. नाना पटोले पक्षाच्या बैठकीत कुणाचेही ऐकत नाही असा गंभीर आरोप विदर्भातील 24 नेत्यांनी केला आहे. त्यामुळे पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा आणि आदिवासी नेते शिवाजीराव मोघेंना प्रदेशध्यक्षपद करा, अशी मागणी पक्षाचे निरीक्षक रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे.आता शिवाजीराव मोघेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँगे्रसमधला कोणता नेता पटोले यांची शिकार करण्यास ठपलेले आहे, हे लपून राहिलेले नाही. केंद्रात 8 वर्षांपासून काँगे्रस सत्तेपासून दूर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील काँगे्रस सत्तेत येईल, असा कोणताही कार्यक्रम पक्षाजवळ नाही. जिंकण्यासाठी अगोदर तशी मानसिक वृत्ती तयार करावी लागते. मात्र काँगे्रस कार्यकर्त्यांना आपण 100 च्या जवळपास पोहचू की नाही, अशी शंका आहे. असे असतांना, महाराष्ट्रात नाना पटोले पक्षाला एक आक्रमक होऊन पक्षाला विजयीपथावर घेऊन जात असतांना, आपल्या नेत्यांचेच पाय खेचणे ही मानसिक वृत्ती चुकीची आहे. आणि तो प्रकार काँगे्रसमध्ये पुन्हा-पुन्हा घडतांना दिसून येत आहे. भारत जोडो यात्रेने काँगे्रसला एक नवसंजीवनी मिळतांना दिसून येत आहे. काँगे्रसला पूर्णवेळ अध्यक्ष देखील मिळाला आहे. त्यामुळे काँगे्रस कष्टाने पुन्हा पूर्वीचे दिवस मिळवू शकते. मात्र काँगे्रसमधील अंतर्गत स्पर्धाच काँगे्रसला संपवतांना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँगे्रसमध्ये देखील असेच गटबाजीचे ग्रहण कायम राहिल्यास काँगे्रसचे पानीपत होण्यास पुन्हा वेळ लागणार नाही.

COMMENTS