Homeताज्या बातम्यामनोरंजन

चित्रपट प्रदर्शिनाआधीच निर्मात्याचे निधन  

चित्रपट निर्मात्याचे आयुष्यभराचे स्वप्न असते की त्याने  कलाकृती बनवली आहे, जे स्वप्न पाहिले आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आणि त्याचं काम लोकांन

शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी घेणार शरद पवारांची भेट
तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन
लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे ः राज्यपाल रमेश बैस

चित्रपट निर्मात्याचे आयुष्यभराचे स्वप्न असते की त्याने  कलाकृती बनवली आहे, जे स्वप्न पाहिले आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आणि त्याचं काम लोकांना कसं वाटलं हे पाहणं. एखादा चित्रपट निर्माता एक चित्रपट बनवण्यासाठी आपली सर्व शक्ती खर्ची घालतो आणि तो चित्रपट प्रेक्षकांच्या पुढ्यात ठेवताना कौतुक करून घेण्यासाठी मात्र तो राहत नाही. परंतु जर संपूर्ण चित्रपट पूर्ण झाला आणि निर्माता हे जग सोडून गेला तर काय अवस्था असेल याची कल्पना करा. असाच काहीसा प्रकार केरळच्या चित्रपटसृष्टीत घडला आहे. केरळमधील तरुण चित्रपट निर्माते जोसेफ मनू जेम्स एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील रुग्णालयात निधन झाले. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. चित्रपटसृष्टीने एक उगवता तारा कायमचा गमावला आहे. केरळमधील तरुण चित्रपट निर्माते जोसेफ मनू जेम्स यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. जोसेफ यांचे वय केवळ 31 होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते.अवघ्या 31 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याने  संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा ‘नॅन्सी राणी’ हा पहिला चित्रपट काही दिवसातच प्रदर्शित होणार होता. जोसेफ जेम्स मनूच्या मृत्यूची पुष्टी हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याने केली आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे जेम्सचा पहिला चित्रपट ‘नॅन्सी रानी’ लवकरच बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार होता. या चित्रपटात अहाना कृष्णा आणि अर्जुन अशोकन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. आहानाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, ‘रेस्ट इन पीस मनू! तुझ्या बाबतीत असे घडायला नको होते.

COMMENTS