Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू

रायपूर/वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या बालोदा बाजार-भाटापारा येथे गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. पिकअप वाहन आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झ

यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती
आयटीआयमध्ये पाटण येथील मनिष जाधव तालुक्यात प्रथम
‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्री झाली आई

रायपूर/वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या बालोदा बाजार-भाटापारा येथे गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. पिकअप वाहन आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. भाटापाराचे एसडीओपी सिद्धार्थ बघेल यांनी ही माहिती दिली.
बालोदाबाजार-भाटापारा रस्त्यावरील खमारिया परिसरात हा भीषण अपघात झाला. खिलोरा येथून साहू कुटुंबातील लोक पिकअप वाहनाने अर्जुनी येथे गेले होते, ते परत येत असताना पिकअप व ट्रकची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक एकाच कुटुंबातील असून काही कौटुंबिक कामानिमित्त खिलोरा येथून अर्जुनी गावात गेले होते. मृतांमध्ये चार मुलांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 10 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 3 गंभीर जखमींना रायपूरला रेफर करण्यात आले आहे.

COMMENTS