कोल्हापूर/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील कणेरी मठामध्ये गेल्याा 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार

कोल्हापूर/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील कणेरी मठामध्ये गेल्याा 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान मागील काळात या लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. याठिकाणी जनावरांचे प्रदर्शन सुरू आहे त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांना आणण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत बारा गायींचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पठान यांनी दिली आहे.श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
COMMENTS