Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि माझे शत्रुत्व नाही

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घातली साद

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्ष टोकाला पोहचला असून, ठाकरे गटाकडून शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण देखील हातातून गेले असतांनाच, उपमुख्यमं

बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करणार्‍याला अटक
नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या गाडीला अपघात
मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्राला अग्रस्थानी आणावे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्ष टोकाला पोहचला असून, ठाकरे गटाकडून शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण देखील हातातून गेले असतांनाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे असो की, आदित्य ठाकरे आम्ही वैचारीक विरोधक आहोत पण शत्रू बिलकूल नाही. अलीकडे शत्रूत्व पाहायला मिळते ते संपवावे लागेल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे त्यांनी घातलेली साद राजकीय वातावरण निवळण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही.त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.  मी माझ्या अनुभवातून शिकलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटले होते का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा देतो.  मी जे बोललो ते कसे खरे होते हे तुम्हाला समजत आहे. मी जे बोललो त्यात अर्धेच खरे समजले पुढे आणखी अर्धे कळते. मी काहीही बोललो की, समोरून दुसरी गोष्ट बाहेर येते. मी हळूहळू बोललो की, सर्व गोष्टी समोरून येतील, असा सूचक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.  अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे. संजय राऊत यांना माझी क्षमता अधिक आहे असे वाटते त्यांना माझ्या क्षमतांवर विश्‍वास वाटतो याबद्दल आभार मानुया. पण अलीकडे संजय राऊत जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्यासारख्या नेत्यांनी बोलताना वस्तूस्थिती पाहून, काही संयम पाळून बोलावे, लोकांना खरे वाटेल असे तरी बोलायला हवे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

COMMENTS