सोलापूर प्रतिनिधी - माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा चालतात त्यावेळेस सर्व महिला त्यांना मिठ्या मारतात त्यांच्य
सोलापूर प्रतिनिधी – माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा चालतात त्यावेळेस सर्व महिला त्यांना मिठ्या मारतात त्यांच्या जवळ जातात. त्या महिला यांच्या कडे भाऊ म्हणून बघतात. आमचे नेते राजीव गांधी यांचा जीव त्यामुळे गेला.कारण एक महिला आली तिने राजीव गांधी यांना भावा सामान मिठी मारली. राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेत चालत होते. वयस्कर महिला तरुण महिला या राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिम्मत होईल का? लगेच त्याच्याबद्दल बोलले जाते खरंतर हाच फरक आहे काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस आहे .त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला भेट देऊन त्यावेळेस त्या बोलत होत्या.
हे सरकार गोरगरिबांचे सरकार नाही आहे. महिलांचे तर नाहीच नाही. महिलांकडे तुच्छ नजरेने बघते. महिलांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. महिलांना न्याय मिळवून देणारे तर दूरच.इंदिरा गांधीची काँग्रेस सोनिया गांधीजी काँग्रेस सदैव तुमच्या सोबत असल्याचा विश्वास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS