अकोले/प्रतिनिधी ः अंगणवाडी सेविकांनी काल सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. आज हजारोचे संख्याने राजूर बालविकास प्र
अकोले/प्रतिनिधी ः अंगणवाडी सेविकांनी काल सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. आज हजारोचे संख्याने राजूर बालविकास प्रकल्पवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा धडकला. यावेळी विविध मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या. नवीन मोबाईल मिळावे, मोबाईलची सर्व भाषा मराठी पाहिजेत मराठी अॅप असल्याशिवाय मुलांची माहिती मोबाईलमध्ये भरणार नाही. अकोले व राजूर प्रकल्पात अमृत आहाराचे थकीत असलेले बिल लवकर मिळावे.अकोले व राजूर प्रकल्पात अंडी व केळीचे थकीत बिल मिळावे. सेविका मदतनीसांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात मोबाईलचा सी.बी. ई भत्ता थकीत मिळावा.मिनी अंगणवाडी सेविकांच्या अंगणवाड्या मोठ्या अंगणवाड्यामध्ये रुपांतर व्हावे मोबाईलचा थकीत रिचार्ज मिळावा. रजिस्टर संपले आहे नवीन रजिस्टर मिळावे चकीत इंधन बिल लवकरात लवकर मिळावे. सादिल खर्चात 2000 रु वरून 5000 रु मिळावे सेवा समाप्तीची पेन्शन दरमहा मिळावी टी.ए. बिल मिळावे.असा मागणीचे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती साताळकर यांना देण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याच्या अंगणवाडी कर्मचारी चे अध्यक्ष एड. निशाताई सिऊरकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सत्यभामा थिठमे राजुर गट नियोजित अध्यक्ष पूजा घाटकर, रखा सोनावणे सोनूताई तळपाडे, सुनंदा मोरे अनुसया वराडे रत्न सोनवणे शेवंताबाई मेमाणे सुनंदा मोरे लंका ताई आदी सह हजारो चे संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या यावेळी राजूर पोलीस स्टेशन चे सा पो. नि गणेश इंगळे पो. कॉ अशोक गाडे पो. कॉ सुनील फटांगरे पो. ना श्रीमती वाडेकर मॅडम सह चोख बंदोबस्त ठेवणेत आला.
COMMENTS