Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मंदिरातून पावणेचार लाखाचे दागिने लांबवले

खोसपुरी शिवारातील रमा देवी मंदिरातील घटना

अहमदनगर प्रतिनिधी - खोसपुरी (ता. नगर) शिवारातील रमा देवी मंदिर चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे तीन लाख 70 हजार रूपये किमतीचे दागिने चोरून ने

दुर्लक्षित घटकांचा सन्मान करण्यात वेगळाच आनंद ः माजी खा. तनपुरे
पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती : मुख्यमंत्री
शासनाच्या आनंदाचा शिधामध्ये 55 लाखांचा घोटाळा

अहमदनगर प्रतिनिधी – खोसपुरी (ता. नगर) शिवारातील रमा देवी मंदिर चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे तीन लाख 70 हजार रूपये किमतीचे दागिने चोरून नेलेे आहे. गुरूवारी पहाटे एक ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमित नंदकिशोर कुलकर्णी (वय 39 रा. बालिकाश्रम रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

खोसपुरी शिवारात तारमानगर येथे तारामा शक्ती मिशनमध्ये रमा देवीचे मंदिर आहे. गाभार्यात देवीची मुर्ती असून त्यावर सोन्या-चांदीचे दागिने होते. गुरूवारी पहाटे एक वाजेच्या नंतर अज्ञात चोरट्यांनी देवीच्या मंदिराचा दरवाजा, कडी-कोयंडा कशाने तरी तोडून आत प्रवेश केला. गाभार्यातील मुर्तीवर असलेले 16 किलोची चांदीची गोल माळ, एक किलो चांदीच्या चरण पादुका, अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या धातूच्या पादुका, मुर्तीवरील सोन्याचे एक मंगळसूत्र असे तीन लाख 70 हजार रूपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून धूम ठोकली. पहाटे चार वाजता चोरीचा प्रकार स्थानिकांच्या लक्ष्यात आला. त्यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी अमित कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह भेट दिली असून तपास पोलीस अंमलदार शेख करीत आहेत.

COMMENTS