Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे ः’बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयाचे नाणे लाँच करणार
चिखली (नाथ) येथे कृषिदूतांचे आगमन
लोकल रेल्वे पकडतांना महिलेचा अपघात

पुणे ः’बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
तक्रार दाखल करत अभिजीत बिचुकलेने लिहिलं आहे,मी कसबा मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर मला विरोधकांकडून मी अर्ज मागे घ्यावा तसेच पुणे सोडून सातार्‍याला जावं आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खून करू अशी धमकी देण्यात आली आहे. तसेच, माझ्या पत्नीच्या मोबाईलवरही धमकीचे कॉल आले आहेत, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे. धमकीमुळे ताबडतोब माझ्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने मला पोलिस संरक्षण देऊन मला धमकीक देणार्‍या व्यक्तींना ताबडतोब अटक करावी, त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. पोटनिवडणुकीतील आचारसंहितेदरम्यान घडलेला हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना तात्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

COMMENTS