Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात 2 हॉटेल चालकांमध्ये वाद

पुणे/प्रतिनिधी ः हॉटेलमधील ग्राहक वाढावेत याकरिता हॉटेलचे मालक वेगवेगळया कल्पना राबवत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत अतात. अशाचप्रकारे प

महाराष्ट्रात आजपासून 15 दिवसांची टाळेबंदी ; जमावबंदी आदेश लागू
संगमनेर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 3 कोटीचा निधी मंजूर
भाजप नेते विनोद तावडे यांना मातृशोक

पुणे/प्रतिनिधी ः हॉटेलमधील ग्राहक वाढावेत याकरिता हॉटेलचे मालक वेगवेगळया कल्पना राबवत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत अतात. अशाचप्रकारे पुण्यातील एका हॉटेल चालकाने आपल्या हॉटेल मधील ग्राहकांची संख्या वाढावी याकरिता ‘मोफत सूप’ देण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली आणि त्यास ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला. परंतु यामुळे आपल्या हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांची संख्या रोडवली या रागातून दुसर्‍या हॉटेल चालकाने मारहाण करत धारदार हत्याराने वार करत जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात सिध्दार्थ भालेराव, दिगवीजय गजरे (रा.खडकी,पुणे) यांचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपी विरोधात मुलायम रामकृपाल पाल (वय-27,रा.खडकी,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सदरची घटना सहा फेब्रुवारी रोजी मेवाड पावभाजी सेंटर समोर चौपाटी खडकी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलायम पाल यांचे संबंधित ठिकाणी ‘ओ शेठ’ नावाचे हॉटेल आहे. तर त्यांचे हॉटेल जवळच आरोपींचे ‘साहेब’ नावाचे हॉटेल आहे. तक्रारदार यांनी त्यांचे हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांची संख्या वाढावी याकरिता जेवणा अगोदर ‘मोफत सूप’ देण्याची योजना नुकतीच सुरु केली होती. त्यामुळे ग्राहक मोठया प्रमाणात हॉटेलला येऊ लागल्याने दुसर्‍या हॉटेल मधील ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी सिध्दार्थ भालेराव आणि दिग्वीजय गजरे यांनी तक्रारदार मुलायम पाल याच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने मारुन जखमी करुन ‘येथे धंदा का करता’ म्हणून शिवीगाळ केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, खडकी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि जखमी झालेल्या इसमास रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. याबाबत पुढील तपास खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस रिकीबे करत आहे.

COMMENTS