Homeताज्या बातम्याक्रीडा

वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू निवृत्त

नवी दिल्ली प्रतिनिधी - 2007 मध्ये भारताला T20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा यांनी निवृत्ती घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी

महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात
माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य
कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज : पैलवान संभाजीराव लोंढे

नवी दिल्ली प्रतिनिधी – 2007 मध्ये भारताला T20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा यांनी निवृत्ती घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी ट्विट करून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 39 वर्षीय जोगिंदर बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. 2007 मध्येच त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 2007 साली भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकला होता. 

हरियाणातील रोहतक येथून आलेल्या जोगिंदर शर्माने भारतासाठी फक्त 4 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्व टी-20 सामने केवळ विश्वचषकात खेळले आणि इतिहास रचला.  2004 मध्ये त्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2007 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. जोगिंदर शर्मा सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून कार्यरत आहेत, ते काही काळापर्यंत हरियाणाकडून रणजी ट्रॉफीही खेळत होते. जोगिंदर शर्मा यांनी ट्विटरवर त्यांचे पत्र शेअर केले आहे, जे त्यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांना पाठवले आहे आणि निवृत्तीची घोषणा केली आहे. जोगिंदर शर्मा यांनी लिहिले आहे की, मी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचे आभार मानतो.  जोगिंदर शर्माने त्याचे चाहते, कुटुंब, मित्रांचे आभार मानले, ज्यांनी त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांवर त्याला साथ दिली. जोगिंदर शर्माने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 

COMMENTS