Homeताज्या बातम्या

मनसे नेते अमित ठाकरे सांगली शहरात दाखल 

सांगली प्रतिनिधी - मनसे नेते अमित ठाकरे सांगली शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी सांगली शहरातील दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी सांगलीचा आराध्य दैव

तरुणांनी पुस्तकांकडे वळावे : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात – मुख्यमंत्री फडणवीस

सांगली प्रतिनिधी – मनसे नेते अमित ठाकरे सांगली शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी सांगली शहरातील दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी सांगलीचा आराध्य दैवत श्री गणरायाचे दर्शन घेतले. गेले तीन दिवस अमित ठाकरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर ते सांगली शहर , कुपवाड मिरज या मुख्य शहरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवातच त्यांनी गणरायाचं दर्शन करून केली. यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सांगली मिरजेतील आणि कार्यक्रमांना ही उपस्थिती लावणार आहेत.  सायंकाळी तासगाव आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तालमीलाही ते भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मनसे आता रिचार्ज व्हायला सुरुवात झालेली आहे.

COMMENTS