पुणे/प्रतिनिधी : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईड बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक
पुणे/प्रतिनिधी : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईड बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. या प्रकरणात अमर मूलचंदान यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्याकडे 27 जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांच्या तपासात अमर मूलचंदानी यांच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही. उलट पुरावा नष्ट केले.
या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अमर मलचंदानी, अशोक मुलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, साधना मूलचंदानी व सागर मूलचंदानी अशा सहा जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी मागितली. परंतु न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. ईडीच्या अधिकार्यांना मूलचंदानी यांच्या घरी सोने, हिर्याचे दागिने व रोख रक्कम मिळाली आहे. दोन कोटी 72 लाख रुपये किमतीचे सोन्याचे व हिर्यांचे दगिने व 41 लाख रुपये रोख मिळाली आहे. ईडीच्या अधिकार्यांनी त्यांच्या चार अलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. ईडीचे अधिकारी छापेमारीस आले तेव्हा अमर मूलचंदानी यांच्या नातेवाईकांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर सीआरपीएफ अधिकार्यांना बोलवण्यात आले. अमर मूलचंदानी घरी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु ईडीच्या अधिकार्यांनी घराची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी एका खोलीत अमर मूलचंदानी सापडले. त्या खोलीला बाहेरुन कडी लावण्यात आली होती.
COMMENTS