Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून होणार लागू

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने यंदा 2023 पासून राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी अभ्

पाच लाखांची लाच घेताना लेखापरीक्षकाला अटक
ऊस बेणे विक्रीसाठी ‘सोशल मिडीया’चा वापर | आपलं नगर | LokNews24 |
पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने यंदा 2023 पासून राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी अभ्यासक्रम जाहीर केला होता. हा वर्णनात्मक अभ्यासक्रम 2025 लागू करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी विविध शहरात आंदोलन करत होते. अखेर याची दखल घेऊन राज्य सरकारने हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पुण्यातील अलका चौकात मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांशी भेट घेत, त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे करून दिले होते. यावेळभ उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मागणींचा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तत्काळ लागू करू नये, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वेळा आंदोनलही केले होते. दरम्यान, पुण्यात आज विद्यार्थ्यांनी अलका चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलनाला सुरुवात केली होती.

COMMENTS