चेन्नई/वृत्तसंस्था ः तामिळनाडूमध्ये 300 अनुसूचित जातीच्या लोकांना मंदिरात पूजा करण्याची संधी देण्यात आली. या लोकांसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, क
चेन्नई/वृत्तसंस्था ः तामिळनाडूमध्ये 300 अनुसूचित जातीच्या लोकांना मंदिरात पूजा करण्याची संधी देण्यात आली. या लोकांसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, कारण त्यांना 80 वर्षांपासून तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील या मंदिरात जाण्यास बंदी होती. हा मुद्दा एका परिषदेदरम्यान समोर आला जिथे अनेक समुदाय, जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आताही गावातील 12 प्रतिस्पर्धी गट याच्या विरोधात असल्याने परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून मंदिराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
300 अनुसूचित जातीचे लोक प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पोहोचले, त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. थेनमुडियानूर गावात सुमारे 500 अनुसूचित जातीची कुटुंबे राहतात. 200 वर्षे जुन्या मंदिरात अनेक दशकांपासून समाजाला प्रवेश करण्यापासून रोखले जात होते. या समाजाला मंदिरात जाण्यापासून रोखणार्या समाजाचे म्हणणे आहे की, दशकांपूर्वीपासून चालत आलेली परंपरा बदलण्याची गरज नाही. सुमारे 750 लोक मंदिर सील करण्याची मागणी करत आहेत. मंदिरात प्रार्थना करण्यासाठी 15 ते 20 अनुसूचित जातीची कुटुंबे पुढे आली आहेत. ही नवी सुरुवात असू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे समाजातील लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. तसेच, हे पाऊल जातीय विभाजन संपुष्टात आणू शकते.
COMMENTS